महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल Live Update

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाउन सुरु झालं आहे. ‘एबीपी माझा’ही नेटीझन्सना अपडेट ठेवण्यासाठी सज्ज आहे. एबीपी माझावर निकालाचं नॉनस्टॉप महाकव्हरेज पाहता येणार आहे.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 24 Oct 2019 03:45 PM
कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन अखेर धावलं, प्रमोद पाटील यांचा दणदणीत, शिवसेना उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव
भाजप उमेदवार रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगरमधून पराभूत
भाजप उमेदवार रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगरमधून पराभूत
भाजप उमेदवार रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगरमधून पराभूत
इंदापूरमध्ये नुकताच भाजपप्रवेश केलेले हर्षवर्धन जाधव पराभूत, मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे पराभूत
शिवसेनेतील 11 तर भाजपचे आठ आयाराम पराभूत

बार्शीत शिवसेनेचे दिलीप सोपल पराभूत
वसई मतदारसंघातून बविआचे हितेंद्र ठाकूर विजयी
मतदारांनी दिलेला कौल मान्य, निकाल अनाकलनीय, कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
वर्सोवा मतदारसंघातून भाजपच्या भारती लव्हेकर विजयी
संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विजयी
शिवसेनेचे अब्दुल सत्तार सिल्लोड मतदारसंघातून विजयी
शिवसेनेचे अब्दुल सत्तार सिल्लोड मतदारसंघातून विजयी
बीड : परळीत पंकजा मुंडे पराभवाच्या छायेत, केजमध्ये नमिता मुंदडा, देवराईत लक्ष्मण पवार विजयी
बोरीवली मतदारसंघात 10 हजार मतं नोटाला, तर लातूर ग्रामीणमध्ये 16 हजार आणि पलुस कडेगावमध्ये 20 हजार मतदारांची पसंती नोटाला
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आशिष शेलार विजयी
राज्यातील जनतेचा कौल अपेक्षेप्रमाणे, 2014 पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसशी यंदाची कामगिरी चांगली : जितेंद्र आव्हाड
कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विजयी
अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी विजयी
शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे- पाटील यांचा विजय तर पुण्यात मुक्ता टिळक यांचा विजय
बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधातील गोपीचंद पडळकर यांच्यासह सगळ्या उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त
सातारा लोकसभा पोटनिवडणूक 2019 मतमोजणी कल, उदयनराजे भोसले 81 हजार मतांनी पिछाडीवर, राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांची विजयाकडे वाटचाल
सातारा लोकसभा पोटनिवडणूक 2019 मतमोजणी कल, उदयनराजे भोसले 81 हजार मतांनी पिछाडीवर, राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांची विजयाकडे वाटचाल
कोथरुड विधानसभा मतदारसंघात तेराव्या फेरीनंतर चंद्रकांत पाटील यांची आघाडी 20 हजारांवरुन अवघ्या तीन हजारांवर आली आहे.
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, नवी मुंबई- ऐरोली मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक 24 हजारांनी, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे जवळपास 5786 मतांनी, पनवेलमधून प्रशांत ठाकूर 26 मतांनी आघाडीवर
कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त होण्याच्या मार्गावर, सुरेश हळदणकर आणि अमल महाडिक हे दोन्ही पराभवाच्या छायेत
राज्यातील पहिला निकाल जाहीर, नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित यांचा विजय
राज्यातील पहिला निकाल जाहीर, नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित यांचा विजय
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील पिछाडीवर, राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आघाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील पिछाडीवर, राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आघाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी, 288 जागांचे कल हाती
भाजप- 111
शिवसेना- 73
काँग्रेस- 37
राष्ट्रवादी- 50
मनसे - 1
वंचित - 1
इतर - 15
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी, 288 जागांचे कल हाती
भाजप- 111
शिवसेना- 73
काँग्रेस- 37
राष्ट्रवादी- 50
मनसे - 1
वंचित - 1
इतर - 15
पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर, 21 जागांपैकी राष्ट्रवादी आणि भाजप 9 जागांवर जागांवर आघाडीवर, तर शिवसेनेला दोन जागांवर आघाडी
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे दुसऱ्या क्रमांकावर, एमआयएम उमेदवार फारुक शाब्दी पहिल्या स्थानी
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दुसरी फेरीत आघाडी, भाजपचे अतुल भोसले पिछाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, सांगली-कोल्हापुरात महायुती पिछाडीवर, कोल्हापुूरात 10 जागांवर महायुती पिछाडीवर तर सांगलीत 6 जागांवर महाआघाडी आघाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, सांगली-कोल्हापुरात महायुती पिछाडीवर, कोल्हापुूरात 10 जागांवर महायुती पिछाडीवर तर सांगलीत 6 जागांवर महाआघाडी आघाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, सांगली-कोल्हापुरात महायुती पिछाडीवर, कोल्हापुूरात 10 जागांवर महायुती पिछाडीवर तर सांगलीत 6 जागांवर महाआघाडी आघाडीवर
परळी मतदारसंघात सलग सहाव्या फेरीत धनंजय मुंडे सहा हजार मतांनी आघाडीवर, पंकजा मुंडे यांना 23 हजार 149 मतं, तर धनंजय मुंडेंना 29 हजार 107 मतं
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील, तर डोंबिवलीमधून मंदार हळबे आघाडीवर
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयराजे भोसले 10 हजार मतांनी पिछाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, पहिल्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघातून 5500 मतांनी आघाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, पहिल्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघातून 5500 मतांनी आघाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, सोलापूरमधून प्रणिती शिंदे 4 हजारहून अधिक मतांनी पिछाडीवर, शिवसेनेचे दिलीप माने आघाडीवर
गुहागरमधून शिवसेनेचे भास्कार जाधव पिछाडीवर, तर श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे यांनाही आघाडी,
याशिवाय, कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांना आघाडी
माहिम मतदारसंघात सदा सरवणकर यांना आघाडी, मनसेचे संदीप देशपांडे पिछाडीवर, तर वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मोठी आघाडी, अभिजीत बिचुकलेला 84 मतं
माहिम मतदारसंघात सदा सरवणकर यांना आघाडी, मनसेचे संदीप देशपांडे पिछाडीवर, तर वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मोठी आघाडी, अभिजीत बिचुकलेला 84 मतं
माहिम मतदारसंघात सदा सरवणकर यांना आघाडी, मनसेचे संदीप देशपांडे पिछाडीवर, तर वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मोठी आघाडी, अभिजीत बिचुकलेला 84 मतं
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, कल्याण ग्रामीणमधून पहिल्या फेरीत मनसेचे राजू पाटील 4531 मतांनी आघाडीवर, शिवसेनेच्या रमेश म्हात्रे 3332 मतांनी पिछाडीवर
मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे पिछाडीवर, अपक्ष उमेदवार आणि रोहिणी खडसे यांच्या कडवी लढत
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे पिछाडीवर, इथे राष्ट्रवादीच्य श्रीनिवास पाटील यांना 1019 मतांनी आघाडीवर आहेत
बारामती मतदारसंघात अजित पवार 6559 मतांनी आघाडीवर तर गोपीचंद पडळकर यांना पिछाडी
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल
कोण आघाडीवर
परळी- धनंजय मुंडे
बीड- जयदत्त क्षीरसागर
वरळी- आदित्य ठाकरे
कळवा-मुंब्रा- जितेंद्र आव्हाड
वांद्रे पूर्व- विश्ननाथ महाडेश्वर
कर्जत-जामखेड- रोहित पवार
शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील
ठाणे,पाचपाखाडी- एकनाथ शिंदे
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल
कोण आघाडीवर
परळी- धनंजय मुंडे
बीड- जयदत्त क्षीरसागर
वरळी- आदित्य ठाकरे
कळवा-मुंब्रा- जितेंद्र आव्हाड
वांद्रे पूर्व- विश्ननाथ महाडेश्वर
कर्जत-जामखेड- रोहित पवार
शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील
ठाणे,पाचपाखाडी- एकनाथ शिंदे
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत तर त्यांना आव्हान देणारे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकलेंनी खातं उघडलेंलं नाही
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत तर त्यांना आव्हान देणारे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकलेंनी खातं उघडलं नाही.
मुंबई : वांद्रे पूर्व मतमोजणी केंद्रावर पहिल्या फेरीतच ईव्हीएम मशिनचा डिस्प्ले बिघडला, मशिन दुरुस्त होईपर्यंत व्हिव्हीपॅट स्लिपची मतमोजणी सुरु होणार
परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना एक हजार मतांनी आघाडी तर कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटीलही आघाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, परळीतून धनंजय मुंडे एक हजार मतांनी आघाडीवर, पंकजा मुंडे पिछाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, पनवेल मतदारसंघातून पोस्टल मतदानात भाजपचे प्रशांत ठाकूर आघाडीवर, भाजपचे मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, तासगाव विधानसभा मतदारसंघातून सुमनताई पाटील आघाडीवर
मुंबईतील सर्व जागांवर महायुती आघाडीवर, अद्याप आघाडीला एकाही जागेवर आघाडी नाही
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर आघाडीवर
मुंबईतील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर, एकाही जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवाराला आघाडी नाही
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी, सोलापुरातून प्रणिती शिंदे सुरुवातीच्या कलामध्ये पिछाडीवर
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या लक्ष्मण जगताप यांची पोस्टल मतदानात आघाडी, भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे पोस्टल मतदानात पिछाडीवर, पिंपरीत गौतम चाबुकस्वार हे पोस्टल मतदानात पिछाडीवर
तुळजापूर : मतमोजणी केंद्रात जाताना दोघांना अटक, मोबाईल पायाला बांधून मतमोजणी केंद्रात जात असताना तपासणीदरम्यान अटक
विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी
नागपूर दक्षिण पश्चिममधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भोकरमधून आघाडीवर
वरळीतून आदित्य ठाकरेंची आघाडी तर मावळमध्ये भेंगडेंची पिछाडी, सुरवातीच्या कलांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर
वरळीतून आदित्य ठाकरेंची आघाडी तर मावळमध्ये भेंगडेंची पिछाडी, सुरवातीच्या कलांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर
आम्ही 220 जागांचा आकडा पार करु, काँग्रेस-राष्ट्रवादी फार काही करु शकणार नाही : गिरीश महाजन
आम्ही 220 जागांचा आकडा पार करु, काँग्रेस-राष्ट्रवादी फार काही करु शकणार नाही : गिरीश महाजन
नागपूर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवरील EVM ठेवलेले स्ट्रॉंग रुम उघडले, EVM कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी कक्षात नेण्यास सुरुवात
भाजप-शिवसेनाला युतीला 250 पर्यंत जागा मिळतील. तर बारामतीत गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना कडवी लढत दिली : चंद्रकांत पाटील
नागपूर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवरील ईव्हीएम ठेवलेले स्ट्रॉंगरुम उघडल्या, कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम मतमोजणी कक्षात नेण्यास सुरुवात
नागपूर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवरील ईव्हीएम ठेवलेले स्ट्रॉंगरुम उघडल्या, कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम मतमोजणी कक्षात नेण्यास सुरुवात
जालना विधानभेचे शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सपत्नीक आज सकाळी प्रसिद्ध राजूर गणपतीचे दर्शन घेतलं,गणपतीची पूजा केली
नागपुर : सावनेर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या नावाखाली पत्रकारांना प्रवेश नाकारले, उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही मोबाईल आणि पेनसुद्धा आत नेण्यास मनाई
कोल्हापुरात तुफान पाऊस, मतमोजणीवर पावसाचं सावट, तर तळकोकणात पावसाची संततधार सुरु, कुडाळ, कसाल, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग भागात पावसाची संततधार सुरु, रात्रभर वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू होती
तासाभरात निवडणुकांचे कल हाती येणार, राज्यातील महत्त्वाच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष
भाजपच्या कार्यालयात विजयाची सुरुवात, कार्यालय फुलांनी सजलं, पेढेही तयार
भाजपच्या कार्यालयात विजयाची सुरुवात, कार्यालय फुलांनी सजलं, पेढेही तयार
मुंबादेवीचे काँग्रेस उमेदवार अमीन पटेल आणि धारावी काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी बॉम्बे हॉस्पिटलच्या वाजुच्या बहाउद्दीन शाह बाबा दर्ग्यावर जाऊन आशीर्वाद घेतला. अमीन यांनी विजयाचा तर वर्षा यांनी धारावी हा काँग्रेसचा गड अबाधित राखण्याचा विश्वास व्यक्त केला.

প্রেক্ষাপট

मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील 3237 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला हाती येणार आहे. आज, 24 रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून यासाठी  पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे 2 वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे.

कशी होईल मतमोजणी
एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदारसंघातील पाच बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बारकोडद्वारे इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.

प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रूमपासून ईव्हीएम ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरूममधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी आणि नंतर पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त
मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

राज्यात विधानसभेसाठी 61.13 टक्के मतदान

राज्यात 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी 61.13 टक्के मतदान झाले आहे. तसेच सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाले आहे.  राज्यात 4 कोटी 68 लाख 65 हजार 385 पुरुष, 4 कोटी 28 लाख 35 हजार 374 स्त्रिया आणि 2 हजार 637 तृतीयपंथी अशा एकूण 8 कोटी 97 लाख 3 हजार 396 मतदारांपैकी एकूण 5 कोटी 48 लाख 38 हजार 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावलेल्यांमध्ये 2 कोटी 94 लाख 73 हजार 184 पुरूष, 2 कोटी 53 लाख 64 हजार 665 स्त्रिया आणि 666 तृतीयपंथींचा समावेश आहे. या निवडणुकीत 62.89 टक्के पुरुष, 59.21 टक्के स्त्रिया आणि 25.26 टक्के तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Vidhan Sabha Election 2019 Results : मतदारसंघांचे अचूक निकाल, कुठे आणि कसे मिळवाल?
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाउन सुरु झालं आहे. ‘एबीपी माझा’ही नेटीझन्सना अपडेट ठेवण्यासाठी सज्ज आहे. सकाळी आठ वाजल्यापासून पहिले कल हाती येण्यास सुरुवात होईल.  एबीपी माझावर सकाळी सहा वाजल्यापासून निकालाचं नॉनस्टॉप महाकव्हरेज सुरु होईल. टीव्हीशिवाय तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा प्रवासात, निकालाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. टीव्हीसोबत वेबसाईट, फेसबुक, ट्विटरपासून अॅपवरील नोटिफिकेशनद्वारे एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुमच्यापर्यंत सर्वात फास्ट निकाल पोहोचवण्यासाठी एबीपी माझानेही खास तयारी केली आहे. वेबसाईटसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरही एबीपी माझाची टीम तैनात असेल. एबीपी माझाच्या साईटवर महाराष्ट्रातील मतदारसंघांची टॅली, लाईव्ह टीवी, लाईव्ह अपडेट आणि ब्रेकिंग न्यूजद्वारे कोणता पक्ष आघाडीवर कोणता पिछाडीवर याची माहिती मिळेल. याशिवाय तुम्ही राज्यातील व्हीआयपी उमेदवारांची परिस्थितीही वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तुम्ही केवळ स्वत:च्याच नाही तर राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचे लाईव्ह अपडेट वाचू शकता. प्रत्येक मतदारसंघाशी संबंधित प्रत्येक लहानमोठी माहिती तुम्हाला मिळेल.

तुम्ही टीव्ही आणि वेबसाईटशिवाय मोबाईल फोन आणि इतर तमाम प्लॅटफॉर्मवर निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.

तुमच्या अँड्रॉईड किंवा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Live अॅप इन्स्टॉल करुन लाईव्ह टीव्ही पाहू शकता. तुमच्याकडे अॅप असेल तर नोटिफिकेशनद्वारेही निकाल मिळतील.

एका क्लिकवर विधानसभा मतदारसंघाची माहिती
एबीपी माझाच्या वेबसाईटवर तुम्हाला विधानसभा मतदारसंघांचा निकाल पाहू शकता. सोबतच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात कोणाचा विजय झाला होता, कोण पराभूत झालं होतं. दोन्ही पक्षांमध्ये किती मतांचं अंतर होतं. तसंच मतदारसंघात किती मतदार आहेत, त्यापैकी पुरुष किती आणि महिला किती याची माहितीही मिळणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.