आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 01 Dec 2019 09:32 PM
आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश :-
आरे कॉलनीमधील मेट्रोच्या कारशेड विरोध करत अनेक पर्यावरणवाद्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
आयआयटी मुंबईत प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी मायक्रोसॉफ्टकडून वार्षिक 1.17 कोटीचे पॅकेज :-

आजपासून मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिजनला सुरवात झाली आहे. प्लेसमेंटच्या पहिल्या स्लॉटमध्ये एकूण आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा 18 कंपन्या सहभागी होत्या. यामध्ये सर्वाधिक प्लेसमेंट ही मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून मिळाली असून वार्षिक 1 कोटी 17 लाखांची प्लेसमेंट देण्यात आली आहे
मायक्रोसॉफ्टकडून ऑप्टिव्हर वार्षिक 1 कोटी 2 लाखांचे तर उबर या विदेशी कंपन्यांनी सुद्धा वार्षिक 1 कोटी 2 लाखांची नोकरी देऊ केली आहे. पहिल्या दिवशी 110 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली
Vidhan Sabha Live | मुख्यमंत्री झाल्याबद्दल उद्धव ठाकरेंचं अभिनंदन, मित्र मुख्यमंत्री झाल्याचा आनंद, विरोधी पक्ष म्हणून त्यांना सहकार्य राहील : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
चांगला विरोधी पक्ष हा भाषणातून दिसतो : बाळासाहेब थोरात
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं अभिनंदन, सभागृहात अनेक प्रश्नांवर चर्चा अपेक्षित
आपण पुढील पाच वर्षे सत्तेत येण्याचा प्रयत्न करु नये, कोणत्याही बाजूच्या सदस्यांना जागा सोडायला लावू नये, जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
Vidhansabha LIVE | संसदीय लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक ही दोन चाकं, कुणावरही अन्याय होणार नाही याची ग्वाही देतो : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
राधाकृष्ण विखे पाटील आमचेच आहेत, त्यांना आम्ही ओढून आणू : जयंत पाटील
विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड, विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी केली घोषणा
देवेंद्र फडणवीस हे आपले नेते, गेली पाच वर्षे त्यांनी चांगलं काम केलं : जयंत पाटील
सातारा जिल्हा शासकिय रुग्णालयातील आणखी हलगर्जीपणाचा कळस, उलट्या होत असल्याच्या कारणातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या युवकाचा इंजेक्शन दिल्यानंतर मृत्यू, पेशंट पहाटे तडफडत असताना रुग्णालयातील डॉक्टर नर्स झोपले असल्याचा नातेनाईकांचा आरोप, विनायक शिंगनाथ असं 22 वर्षीय युवकाचं नाव
मी भाग्यवान आहे, जे विरोधात होते ते मित्रपक्ष झाले, जे मित्रपक्ष होते ते विरोधी पक्षात आले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत राजकारण तापलं, कॉंग्रेसचे बहुमत असून महापौर पदासाठी काँग्रेस, सेना आणि कोणार्क आघाडीचा दावा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे 15 ते 16 नगरसेवक फुटले आहेत. 90 सदस्य असलेल्या भिवंडी महानगरपालिका सभागृहात कॉंग्रेस 47 , भाजपा 19 , शिवसेना 12 , कोणार्क विकास आघाडी 4 , सपा 2, आरपीआय एकतावादी 4 , अपक्ष 2 असे बलाबल आहे. 5 डिसेंबर रोजी भिवंडी महानगरपालिकेसाठी निवडणूक पार पडणार आहे.
सातबारा नुसता कोरा करायचा नाही तर शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचं आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
VidhanSabha Live | शेतकरी पुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आनंद, बंडखोर स्वभावाचा, अन्याय सहन न करणारा, आपलं मत मांडताना कोणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा अध्यक्ष : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
VidhanSabha Live | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल विरोधकांचे आभार, काल झालेलं नुकसान आज भरुन काढलं : मंत्री जयंत पाटील
नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी निवडीची घोषणा, पदभार स्वीकारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन आणि स्वागत
VidhanSabha Live | नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी, विधानसभा अध्यक्षपदासाठी आम्ही अर्ज भरला होता, पण या सभागृहाच्या परंपरा आहेत, अध्यक्ष चुरशीच्या निवडणुकीत निवडून जाणे योग्य नाही, म्हणून अर्ज मागे घेतला : देवेंद्र फडणवीस
VidhanSabha Live | नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी निवडीची घोषणा, हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची घोषणा
Vidhan Sabha Live : विधानसभेचे कामकाज सुरु, शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांची हेक्टरी मदत तातडीने द्या : देवेंद्र फडणवीस
VidhanSabha Live | आरे मध्ये 22 विद्यार्थ्यांना जेलमध्ये टाकलं त्यांचं आयुष्य उध्वस्त झाले, हे गुन्हे माफ करण्यात यावे, जितेंद्र आव्हाड यांची मागणी
राज्यपाल अभिभाषण चार वाजता, 3.45 वाजता राज्यपाल विधीमंडळात येतील , त्यांना मानवंदना देण्यात येणार ,
त्यानंतर मध्यवर्ती सभागृहात अभिभाषण होणार
भाजपच्या किसन कथोरेंनी अर्ज मागे घेतला
विधानसभा अध्यक्षांनंतर विरोधी पक्षनेतेपदाची निवड आजच होणार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार विरोधी पक्षनेते
अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध, नाना पटोले विधानसभेचे नवीन अध्यक्ष
विरोधी पक्षनेता नेमणूक लांबली, आज देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती होणार नाही, कामकाजात विरोधी पक्षनेते पदची नेमणूक नाही, , हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचं देवेंद्र फडणवीस यांना चहा साठी आमंत्रण
वर्धा : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता सुनील गायकवाड याला लाच घेताना अटक , पाईपलाईनच्या कामातील एमबी रेकॉर्ड करण्यासाठी 1 लाख 35 हजारांची लाच मागितली होती , सापळा रचून कार्यालयातच 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली
34 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात, सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानापासून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यामध्ये मुख्य मॅरेथॉन 42 किमी, हाफ मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी, व्हील चेअर अशा विविध अंतरगटाचा समावेश आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


१.विधानसभाध्यक्षपदासाठी खुल्या मतदानाच्या प्रस्तावाची शक्यता, सत्ताधाऱ्यारंकडून पटोले तर भाजपचे कथोरे मैदानात, सकाळी ११ वाजता निवडणूक

२. 169 विरुद्ध शून्य फरकानं ठाकरे सरकारनं बहुमत चाचणी जिंकली, अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत भाजपचा सभात्याग, मनसे, माकप, एमआयएम तटस्थ

३. मंत्र्यांचा शपथविधी आणि हंगामी अध्यक्ष बदलल्यानं फडणवीसांचा हल्लाबोल, आंबेडकर, शाहू, फुलेंची असूया का? महाविकास आघाडीचा भाजपला सवाल

४. आकड्यांचा खेळ जिंकणारे सभागृहात आकडे चुकले, शिरगणतीदरम्यान अनेक आमदार स्वतःचा अंक विसरल्यानं सभागृहात हशा

५.महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानीच्या तिजोरीवर डल्ला, माणिक, दागिने आणि पुरातन नाणी गायब, चौकशी समितीच्या पाहणीनंतर वास्तव उजेडात

६. हैदराबादमधल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट, महाराष्ट्रात पुणे, हिंगोलीसह अनेक ठिकाणी आंदोलन, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या तरुणीची मुस्कटदाबी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.