LIVE UPDATE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे उत्तर देतील : संजय राऊत

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 08 Nov 2019 05:20 PM
फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार हीचं आमची काळजी
फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार हीचं आमची काळजी
भाजपच्याच नेतृत्त्वात पुढचं सरकार स्थापन होईल, भाजप सरकार बनवताना घोडेबाजार करणार नाही- देवेंद्र फडणवीस
भाजपच्याच नेतृत्त्वात पुढचं सरकार स्थापन होईल, भाजप सरकार बनवताना घोडेबाजार करणार नाही- देवेंद्र फडणवीस
मुंबई; देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद लाइव्ह
मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस लाइव्ह

शिवसेना भाजपमधील तिढा सुटण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीस यांचे ते वक्तव्य मागे घेण्यासाठी ड्राफ्ट बनवण्याची तयारी, तसंच शिवसेनेच्या नेत्यांशीही संपर्काचा प्रयत्न, सूत्रांची माहिती
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांचं मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र, 8 ते 15 तारखेपर्यत आमदारांना सुरक्षा द्या, रिट्रीट हाॅटेलवर आमदारांना थोड्याच वेळात घेऊन जाणार
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांचं मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र, 8 ते 15 तारखेपर्यत आमदारांना सुरक्षा द्या, रिट्रीट हाॅटेलवर आमदारांना थोड्याच वेळात घेऊन जाणार
गांधी कुटुंबाचं एसपीजी सुरक्षा कवच केंद्र सरकारने काढलं, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना आता 'झेड' प्लस सुरक्षाच मिळणार, सूडाच्या भावनेने सरकारने एसपीजी सुरक्षा काढल्याचा काँग्रेसचा आरोप
गांधी कुटुंबाचं एसपीजी सुरक्षा कवच केंद्र सरकारने काढलं, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना आता 'झेड' प्लस सुरक्षाच मिळणार, सूडाच्या भावनेने सरकारने एसपीजी सुरक्षा काढल्याचा काँग्रेसचा आरोप
रंगशारदा हॉटेलमधील सर्व आमदारांची जबाबदारी अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर आहे.
अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे जवळचे विश्वासू नेते मानले जातात. या दोघांच्या नेतृ्त्वाखाली सर्व आमदारांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत आहे. अनिल परब यांची संपूर्ण टीम सर्व आमदारांवर लक्ष ठेऊन आहे. प्रत्येक तासांची अपडेट अनिल परब उद्धव ठाकरेंना पोहोचवत आहेत.
भाजप-शिवसेना यांच्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी सत्ता स्थापनेचा नवा फॉर्म्युला सुचवलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इतरांनी पाठिंबा द्यावा, असं चाकूरकर यांचा प्रस्ताव. शिवसेनेनं आघाडीला पाठिंबा देण्याची मागणीही चाकूरकरांनी दिलीय. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या फॉर्म्युल्याने चर्चेला उधाण आलंय.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट, शिवसेना आमदाराला 50 कोटींची ऑफर, विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप, भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न - विजय वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट, शिवसेना आमदाराला 50 कोटींची ऑफर, विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप, भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न - विजय वडेट्टीवार
शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर ठाम असल्याची भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा बोलून दाखवली. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच त्यांनी मातोश्रीवर यावं, असं राऊतांनी नमूद केलं. शिवाय, पैसा आणि सत्तेचा वापर करुन कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाऊ शकतो, असा आरोपही राऊतांनी केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे भाजपचं षडयंत्र असल्याचा घणाघात राऊतांनी केला.
कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. हा विषय शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधला आहे, त्यात तिसऱ्या कोणाचीही गरज नाही : संजय राऊत
राष्ट्रपती राजवटीच्या आड राजकारण हा जनतेचा अपमान. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपने लेखी पत्र घेऊन यावं : संजय राऊत
राष्ट्रपती राजवटीच्या आड राजकारण हा जनतेचा अपमान. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपने लेखी पत्र घेऊन यावं : संजय राऊत
रबाळेजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रान्सहार्बर रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठाणे-वाशी रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
पंढरपूरला वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात पाच वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मडोळीचे चार आणि हंगरगा गावच्या एका वारकऱ्याचा अंत झाला. सांगोल्याजवळ टेम्पोने समोरील वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला.
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी, लालबाग, अंधेरी, ठाणे, भिवंडी, शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन, वयाच्या 79 वर्षी दीर्घ आजाराने निधन, मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात अखेरचा श्वास
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माटुंग्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने, अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने, सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त झाल्याची रेल्वची माहिती, मात्र गाड्या उशिराने

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in.

हेडलाईन्सवर एक नजर...

1. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर गजबजलं, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा, हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला

2. फोडाफोडीच्या राजकारणामुळे राजकीय पक्षांची खबरदारी, शिवसेनेच्या आमदारांना भेटण्यासाठी आदित्य ठाकरे रंगशारदा हॉटेलात, तर काँग्रेसही आपल्या आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारीत

3. तांत्रिक बाब म्हणून देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, अवघ्या काही तासात 13व्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार, राज्यात घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता

4. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यासाठी तयार असाल तरच चर्चा, उद्धव ठाकरे आक्रमक, तर राज्यपालांच्या भेटीत भाजपकडूनही सत्तास्थापनेचा दावा नाहीच

5. अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अलर्ट जारी, गृहमंत्रालयाकडून यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश, 17 नोव्हेंबरपर्यंत निकाल येण्याची शक्यता

6. राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन, वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईतल्या हरकिरनदास रुग्णालयात अखेरचा श्वास

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.