बर्फाच्या लादीवर झोपून माजी नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 04 Feb 2020 10:43 PM
महानगरपालिके समोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करून चर्चेत राहिलेले माजी नगरसेवक डॉ.दिनेश नाशिपुडी हे पुन्हा एकदा आपल्या आंदोलनामुळे चर्चेत आलेत. दिनेश नाशिपुडी यांनी महानगरपालिके समोर बर्फाची लादी आणूंन त्यावर झोपून आंदोलन केले.बेळगाव मनपाच्या अखत्यारीत येणाऱ्या बसवनकोळ या जल शुद्धीकरण प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी महापालिके समोर आंदोलन केले आहे. बर्फाच्या लादीवर तब्बल दहा मिनिटं झोपून त्यांनी हे आंदोलन केले. सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी हे आंदोलन केले मनपा अभियंत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला अशा पद्धतीनं अनोखं आंदोलन करत मनपा अधिकारी व जनतेचे लक्ष त्यांनी वेधून घेतलं आहे. बसवणकोळ जलशुद्धीकरण प्रकल्प घोटाळा नाशिपुडी यांनी उघडकीस आणला होता याबाबत अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन झाली होती त्यांनी चौकशी केली त्या चौकशीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते मात्र याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकल्पास भेट दिली होती मात्र भ्रष्टाचाराची चौकशी केली नव्हती या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी त्यांनी अनोखं आंदोलन हाती घेतल होतं.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, विजया रहाटकर यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला.
ठाकरे सरकार करणार पाच दिवसांचा आठवडा?, पाच दिवसांच्या आठवड्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली महत्वाची बैठक, राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा राजपत्रित अधिकारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अंडर 19 World Cup | टीम इंडियाकडून पाकिस्तानचा धुव्वा, 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये, यशस्वी जयस्वालचे दणकेबाज शतक
औरंगाबादमध्ये शिक्षकाने सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला, संतप्त पालकांचा शाळेत गोंधळ
सांगली : 2015 साली हिवरे गावामध्ये घडलेल्या महिलांच्या तिहेरी हत्या प्रकरणाचा निकाल, दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाखाचा दंड, सुधीर सदाशिव घोरपडे आणि रवींद्र रामचंद्र कदम अशी आरोपींची नावे
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण, वर्ध्यात सर्वपक्षिय मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला, पोलिसांनी प्रांत ऑफिसच्या दारावर मोर्चा अडवला, प्रांताधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण, आरोपी विक्की नगराळेला न्यायालयात हजर केलं, 8 फेब्रुवारीपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी, सरकारी वकील एस डी गावडे यांनी मांडली बाजू
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण, आरोपी विक्की नगराळेला न्यायालयात हजर केलं, 8 फेब्रुवारीपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी, सरकारी वकील एस डी गावडे यांनी मांडली बाजू
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद दुकाने फोडून लाखो रुपये लंपास करणाऱ्या मुंबईतील टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले असून त्यांनी राजापूर सावर्डा इथे चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद खान, रिझवान खान, मुमताज शेख, एजाज सिद्दीकी, मदिना चाव, मुस्ताक खान सर्व राहणार कौसा मुंब्रा ठाणे यांना अटक करण्यात आली आहे.
वर्धा : हिंगणघात जळीतकांड प्रकरण, मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची प्रक्रिया सुरु, हिंगणघाट पीडितेला सरकारचा मदतीचा हात
यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय झाला आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजपच्या सुमीत बाजोरिया यांचा पराभव केला. त्यांच्या विजयानंतर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
यवतमाळ - विधानपरिषद पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आघाडीवर आहेत. दुष्यंत चतुर्वेदी यांना 298 मतं मिळाली असून भाजपचे सुमीत बाजोरिया 185 यांना मतं मिळाली आहेत. तर सहा मतं अवैध ठरली आहेत. त्यामुळे दुष्यंत चतुर्वेदी यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा मोट बांधली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकासआघाडी एकत्र येणार असून आज पहिल्या मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, अशोक चव्हाण, विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच आता महाविकासआघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेलं मराठा तरुणांचं आंदोलन पेटण्याची चिन्हं आहेत. कारण सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबतच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मागण्या मान्य होत नसल्यानं आत्मदहनाचा इशाराही आता या तरूणांनी दिला आहे.
मुंबईच्या नागपाड्यात सुरू असलेलं आंदोलन येत्या गुरुवारी मागे घेण्यात येणार आहे. आंदोलनाचे आयोजक नसीम सिद्दीकी यांनी ही माहिती दिली आहे. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात गेले 10 दिवस नागपाड्यात मुस्लिम महिलांचं हे आंदोलन सुरू होतं.
शरजीलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याप्रकरणी 51 जणांच्या विरोधात मुंबईत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई प्राइड सॉलिडेटरी गॅदरींग 2020 मध्ये जेएनयूचा विद्यार्थी नेता शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. विक्की नगराळे नावाच्या तरुणानं एकर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीच्या चेहऱ्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. संपूर्ण चेहरा भाजल्यानं तरुणीची वाचा गेली आहे. तसेच तरूणी गंभीर जखमी झाली असून दृष्टी देखील जाण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जिवंत जाळलं, तरुणीची मृत्यूशी झुंज, अटकेतील आरोपीला फाशी देण्याची मागणी, तर हिंगणघाटमध्ये आज सर्वपक्षीय बंद
2. शरजील इमामच्या समर्थनाथ घोषणा दिल्याने 51 जणांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल, मुंबईत आझाद मैदान पोलिसांची कारवाई
3. सीएएविरोधातली आंदोलनं हे राजकीय कटकारस्थान, शाहीन बागप्रकरणी मोदींचं वक्तव्य, दिल्लीतल्या रॅलीत काँग्रेस, केजरीवालांवर घणाघात
4. मराठा तरुणांच्या मागण्यावर मुख्य सचिवांबरोबच्या बैठकीत तोडगा नाहीच, आझाद मैदानात आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय
5. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 95 लाचखोर जाळ्यात, चिरीमिरी घेण्यात पोलीसच अव्वल, तर सर्वात जास्त पुण्यातल्या लाचखोरांवर कारवाई
6. अंडर नाईंटीन विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान उपांत्य फेरीची महामुकाबला, भारताला सातव्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.