LIVE UPDATES | 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक अखेर मागे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची माहिती

दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा...

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 13 Jan 2020 11:36 PM
छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या वादग्रस्त पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नाही, पुस्तक मागे घेण्यात आलं आहे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून भाजपची अधिकृत भूमिका स्पष्ट

वाडिया रुग्णायलाचं प्रकरण आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, उद्या सायंकाळी साडेचार वाजता होणार महत्वाची बैठक. वाडियाचे ट्र्स्टी, मुंबईचे महापौर आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार.
पाकिस्तानेच माजी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची फाशी रद्द...
मुंबई : बोईसर स्फोटाप्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवा, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे आदेश..
भाजपने हे पुस्तक प्रकाशित केलेलं नाही. हा पूर्णपणे लेखकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. पुस्तक माघारी घ्यायचं असेल तर ते लेखक घेतील. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे. भाजपच्या राष्ट्रीय मीडिया सेलचे सहसमन्वयक संजय मयूख यांची फोनवरुन प्रतिक्रिया
नागपूर जिल्ह्यात नवीन वर्षातील पहिल्या 12 दिवसात एकानंतर एक आठ हत्या, रविवारी राष्ट्रीय युवा दिन असताना नागपूर जिल्ह्यात आजवर कधीही कोणत्याही गुन्ह्यांमध्ये सहभाग नसलेल्या दोन तरुणांचा शुल्लक कारणांनी खून, एकाची हत्या घरासमोर मद्यपान करुन बसलेल्या मद्यपीला हटकल्यामुळे, तर शरीर सौष्ठव स्पर्धेतील निकालातील वादातून जिम संचालकाची हत्या
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची तुलना : जयभगवान गोयल यांच्याविरोधात महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल, दिनकर जगदाळे यांच्या तक्रारीनंतर सोलापुरातील फौजदारी चावडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर साई दरबारी, पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि भाऊ अजित तेंडुलकरसह साईबाबांच्या दर्शनाला
मुंबई विमानतळावर एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, टर्मिनल 2 वर पार्किंग इमारतीवरुन उडी मारली, रुग्णालयात रवानगी
मुंबई विमानतळावर एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, टर्मिनल 2 वर पार्किंग इमारतीवरुन उडी मारली, रुग्णालयात रवानगी
मुंबईत टॅक्सींवर आता तीन दिवे लागणार आहेत. लाल, हिरवा आणि पांढरा अशा तीन रंगांचे हे दिवे असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकारने हा निर्णय घेतला असून 1 फेब्रवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. प्रवाशांचे टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांसोबत नेहमीच वाद होत असतात. त्यामुळे आता मुंबईत प्रवाशांच्या सोयीसाठी टॅक्सींवर तीन रंगाचे दिवे लागणार आहेत, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली.
वाडिया रूग्णालय बंद होण्याच्या मार्गावर, कर्मचाऱ्यांचं रूग्णालयाबाहेर आंदोलन सुरू, निधी अभावी रूग्णालय बंद होणार, शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर आंदोलनात सहभागी
वाडिया रूग्णालय बंद होण्याच्या मार्गावर, कर्मचाऱ्यांचं रूग्णालयाबाहेर आंदोलन सुरू, निधी अभावी रूग्णालय बंद होणार, शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर आंदोलनात सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना कदापि शक्य नाही. या तुलनेमुळे शिवरायांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला राग येणं स्वाभाविक आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावर बंदी घालावी : छगन भुजबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना कदापि शक्य नाही. या तुलनेमुळे शिवरायांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला राग येणं स्वाभाविक आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावर बंदी घालावी : छगन भुजबळ
भाजपने 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक मागे घ्यावं. तसंच या पुस्तकाशी संबंध नसल्याचं स्पष्ट करावं : संजय राऊत
महाराष्ट्रातील जनता बोलतेय, छत्रपतींच्या गादीच्या वारसदारांनी बोललंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी भाजपमधून राजीनामे द्यावे : संजय राऊत
छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचं दैवत, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना चुकीची : संजय राऊत
कामं सुरू करण्याआधी आमदार, खासदार कॉन्ट्रॅक्टरला भेटायला बोलावतात असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. विशेष म्हणजे मराठवाड्यात हे सुरू असल्याचं गडकरी म्हणालेत. त्यामुळे गडकरींचा रोख मराठवाड्यातील कोणत्या आमदार, खासदाराकडे असा प्रश्न निर्माण होतं आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराज यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होईल. मानाच्या पहिल्या दोन नंदी होण्याचे विधिवत पूजा करुन पहिला तैलाअभिषेक करण्यात येतं. सोलापुरातील मानकरी असलेल्या पाण्यात हा सोहळा पार पडणार आहे. नंदीध्वज पूजन झाल्यानंतर सोलापुरातील 68 लिंगाना प्रदक्षिणा घालून नंदीध्वज सिदेश्वर मंदिरात अमृत लिंगाजवळ पोहोचतील. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे आपल्या परिवाराचे उपस्थित आहेत. महापौर श्रीकांतला जनम आयुक्त दीपक तावरे हे देखील आपल्या परिवारासह विधिवत पूजा साठी उपस्थित आहेत.
मनसेच्या नव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करु नये असा विनंतीवजा इशारा आर. आर. पाटील फाऊंडेशनतर्फे देण्यात आलाय. 23 जानेवारीला म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला मनसेचं मुंबईत मेळावा होणार असून, त्यात नव्या झेंड्याचं अनावरण होणार असल्याचं कळत आहे. या झेंड्यावर मनसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आर. आर. पाटील फाऊंडेशननं मनसेला इशारा दिला आहे.
ज्या पुस्तकामुळे पक्षावर चौफेर टीका होत आहे ते 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक भाजप मागे घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. भाजप नेते जयभगवान गोयल यांनी पंतप्रधानाच्या स्तुतीपर लिहिलेल्या पुस्तकात मोदींची तुलना महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. भाजपच्या दिल्लीतल्या कार्यालयात या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. दरम्यान या पुस्तकावरुन वादंग उठला आहे. शिवप्रेमींबरोबरच इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in



महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. भाजप नेते जय भगवान गोयलांच्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन वादंग, काँग्रेसची पोलिसांत तक्रार, शिवप्रेमींचा भाजपवर हल्लाबोल
2. मोदींशी तुलना महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का? संजय राऊतांचा सवाल, जीभेला लगाम लावा म्हणत संभाजीराजेंचं प्रत्युत्तर
3. मनसेनं नव्या झेंड्यावर शिवमुद्रेचा वापर करु नये, आर. आर. पाटील फाऊंडेशनचा विनंतीवजा इशारा, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
4. मराठीद्वेषी कर्नाटक नवनिर्माण सेना आणि झुंडशाहीविरोधात साहित्यिकांचा ठराव मंजूर, उस्मानाबादमधील साहित्य संमेलनाची सांगता
5. डाव्या विचारसरणीच्या संघटना शिक्षणक्षेत्रातील वातावरण बिघडवताहेत, देशभरातले 200 शिक्षण तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित विद्यापीठांच्या कुलगुरुंचं मोदींना पत्र
6. अमेरिका-इराण संघर्ष सुरुच, इराणकडून अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर पुन्हा रॉकेट हल्ला, 6 दिवसांमधील दुसरा रॉकेट हल्ला

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.