LIVE UPDATES | महाराष्ट्र बंद : ठाण्यात वंचितचे कार्यकर्ते ताब्यात, चेंबूरमध्ये बसच्या काचा फोडल्या

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 24 Jan 2020 10:01 AM
वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद | ठाण्यातील तीन हात नाका चौकात रास्ता रोको आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, तर चेंबूरमध्ये स्वस्तिक पार्क इथे बस थांबवून काचा फोडल्या
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा फोन टॅप करण्याप्रकरणी सुधीर मुनगंटीवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपली
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा फोन टॅप करण्याप्रकरणी सुधीर मुनगंटीवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपली
पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू होण्याची शक्यता, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता, मुख्य सचिवांच्या आढाव्यानंतर लवकरच निर्णयाची शक्यता
केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए, सीएएविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये 35 संघटना सहभागी होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. तरी, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आजचा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे आता या बंदला महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in



महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक, सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा कडाडून विरोध, 35 संघटनांचा सहभाग
2. हिंदुत्त्वाचा ट्रॅक पकडल्यानंतर राज ठाकरेंचं सीएए, एनआरसीला समर्थन, 9 फेब्रुवारीला मोर्चा, झेंड्यावरच्या राजमुद्रेचा गैरवापर न करण्याचं आवाहन
3. रंग बदलून सरकारसोबत कधीही जाणार नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आमचा अंतरंगच भगवं, उद्धव ठाकरेंचा पलटवार
4.परप्रांतीयांबाबत विरोध सोडला तर मनसेचा विचार करू, मुनगंटीवारांपाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडूनही मनसेसोबत युतीचे संकेत
5. आघाडी नेत्यांच्या फोन टॅपिंग आणि हेरगिरीप्रकरणी सायबर सेलकडून चौकशी, गृहमंत्री अनिल देशमुखांचे आदेश, दिग्विजय सिंहांच्या आरोपाची दखल
6. भारत-न्यूझीलंड दरम्यान आजपासून पाच टी20 सामन्यांची मालिका, ऑकलंडच्या ईडन पार्कवर दुपारी पहिली मॅच

एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.