मुख्यमंत्री कार्यालय कामकाजासाठी मुख्य समन्वय अधिकारी रवींद्र वायकर यांची म्हणून नेमणूक
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
06 Feb 2020 10:33 PM
मुलीच्या लग्नाची पत्रिका देऊन परतत असताना अपघात, अपघातात दुचाकीने पेट घेतल्याने वडिलांचा मृत्यू, सोलापूर-बार्शी रोडवरील दुर्दैवी घटना
हिंगणघाट पीडितेची स्थिती पाहण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑरेंज सिटी रुग्णालयात भेट दिली. फडणवीस यांनी डॉक्टर्ससोबत चर्चा करत पीडितेची माहिती घेतली. सरकारने यात लक्ष घालणे गरजेचे आहे. घृणास्पद हिंसेच्या घटनांत कारवाई झालीच पाहिजे. आम्ही देखील त्यात सहकार्य करु, असं फडणवीस यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री कार्यालय कामकाज रवींद्र वायकर यांची मुख्य समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक, मुख्यमंत्री कार्यालय कामकाज, शिवसेना पक्ष कामकाज सगळ्यांचे समन्वयाचे महत्वाचे काम रवींद्र वायकर यांच्याकडे , मुख्यमंत्री कार्यालयात विशेष पद तयार करून वायकर यांची नियुक्ती
कोरोना विषाणू : राज्यात चार जण निरीक्षणाखाली, 22 जणांना घरी सोडले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयात निरीक्षणाखाली सध्या चारजण दाखल आहेत. त्यातील तीन नागपूर येथे तर एक मुंबईत दाखल आहे.
नागपूर येथे दाखल असलेल्या तिघांपैकी एकाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
भिवंडी : भिवंडी शहरातील न्यू कान्हेरी परिसरात लागलेली आग सहा तास उलटूनही धुमसत
गुटखामुक्त महाराष्ट्रसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल, गुटखा साठा, विकणे ह्यात संघटित गुन्हेगारी आढळली तर त्या प्रकरणी मकोका लावणार
बॉलीवुड अभिनेता संजय दत्त याने आज शिर्डी साई दरबारी हजेरी लावली. साईबाबांच्या दर्शनासाठी संजूबाबा साई मंदिर परिसरात पोहचताच त्याच्या चाहत्यांनी संजूबाबाच्या नावाचा जयघोष करत त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. चाहत्यांच्या गरांड्यात कसाबसा संजूबाबा साई मंदिरात पोहचला. साईबाबांच्या मुर्तीसमोर पोहचताच संजय भाऊक झाल्याच पहावयास मिळालं.
राज्यात महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना पाहता एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, माजी मंत्री भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
काँग्रेस कार्यकर्त्यांची असंवेदशीलता, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर डॉक्टरांसह पीडितेला भेटायला जात असताना काँग्रेस कार्यकर्त्याचा आयसीयूत जाण्याचा प्रयत्न
डोंबिवली पश्चिमेला रेल्वे रुळांच्या बाजूलाच रेल्वेच्या जुन्या चाळी आहेत. या चाळी जीर्णावस्थेत पडून असल्यानं नेहमीच इथे गैरकृत्य होत असतात. आज सकाळी याठिकाणी रस्त्याच्या कडेला एक सुटकेस आणि त्यात मृतदेह असल्याचं स्थानिकांना आढळून आलं. यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतला. अंदाजे 45 वर्षांच्या पुरुषाचा हा मृतदेह असून त्याची ओळख पटू नये, यासाठी चेहरा जाळण्यात आल्याचं समोर आलंय. विष्णूनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत.
काँग्रेसच्या विचारानं गेलो असतो तर देश बदलला नसता : पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत भाषण..
महाराष्ट्र विकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी मंत्र्यांना सरकार सुरक्षा पुरवतं पण आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, अशी मागणी काल करण्यात आली. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांनी सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली आहे. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या घराची रेकी झाली होती. मात्र भाजप सरकारने आवश्यक सुरक्षा पुरवली नव्हती. त्यामुळे सुरक्षा वाढवण्याची मागणी त्यांनी केली. तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धोका पाहता सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
धक्कादायक! मुंबईकरांची लाईफलाईन ठरतेय डेथलाईन, मध्य रेल्वेवरील सर्वाधिक मृत्यू हे कल्याण आणि कुर्ला स्थानकात
परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा उपसा आणि अवैद्य वाहतूक प्रशासनाने थांबली आहे. परळी शहर आणि परिसरात थर्मलमधून बाहेर पडणाऱ्या राखेची वाहतूक रस्त्यावरुन होते. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. यासंदर्भात परळीचे उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी राख साठवतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र उपसा केलेल्या ओल्या राखेची वाहतूक रात्री अकरा ते सकाळी सहा दरम्यान करण्याचे सूचना यावेळी वाहतूकदारांना दिल्या आहेत. जर राखेवर पाणी शिंपडले आणि ती ताडपत्रीने झाकून त्याची वाहतूक केली तर त्यापासून प्रदूषण होत नाही. मात्र ओल्या राखेच्या वाहतूक करणार्यांनाही दिवसा प्रतिबंध घालण्यात आला आहे.
प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यवर एका महिलेच्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणशे आचार्यसोबत दोन महिलांवरही गुन्ह्याची नोंद झाली आहे. 26 जानेवारीला इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशन या कार्यक्रमात तरुणींना धक्काबुक्की केल्याचा आरोप गणेश आचार्यवर आहे. गणेश आचार्यने अश्लील चित्रफीत दाखवल्याचं तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगाला केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. त्याची दखल घेत मुंबईतल्या अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रकरण ओशिवारा पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे.
गोव्यातील आमदार रोहन खंवटे यांना अटक करण्यात आली आहे. भाजपचे पदाधिकारी प्रेमानंद म्हांबरे यांना धमकी दिल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांची कारवाई करण्यात आली. प्रेमानंद म्हांबरे यांनी रोहन खंवटे यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर विधानसभा परिसरात खंवटे यांनी धमकी दिल्याची तक्रार म्हांबरे यांनी नोंदवली होती. सभापतींच्या परवानगीनंतर पोलिसांनी रात्री उशिरा अटक करण्यात आहे. दरम्यान रोहन खवंट यांची आज पहाटे जामिनावर सुटका झाली. या घटनेचे पडसाद आज विधानसभेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे. गोवा विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात पुन्हा दोन मोबाईल सापडले आहेत. पोलीस अधीक्षक शरद शेळके यांनी पदभार स्वीकारताच कारागृहाची झाडाझडती केली. तपासणीदरम्यान दोन मोबाईल आणि चार बॅटरी जप्त केल्या. कारागृहात दीड महिन्यांपूर्वीही एक मोबाईल सापडला होता.
पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पम्पिंग स्टेशन इथे आज (6 फेब्रुवारी) विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या (7 फेब्रुवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. औरंगाबाद जळीतकांडातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, तर वर्धा जळीतकांडाच्या खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, पीडितेची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वधर्मियांची प्रार्थना
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तारखेनुसार शासकीय शिवजंयती साजरी करतील, तर शिवसेनेची तिथीनुसार शिवजंयती, तिथी-तारखेचा वाद मिटवण्यासाठी समिती स्थापन करणार
3. राम मंदिर निर्मितीसाठी ट्रस्टची घोषणा, 15 सदस्यांमध्ये पुण्याचे गोविंददेव गिरी महाराज, पंतप्रधान मोदींनी दिल्ली निवडणुकांचं टायमिंग साधल्याचा विरोधकांचा आरोप
4. तीन वर्षात महाराष्ट्रातून तब्बल 84 हजार महिला बेपत्ता, एनसीआरच्या धक्कादायक आकडेवारीनंतर वास्तव उजेडात, मुली बेपत्ता होण्यात मुंबई पहिल्या क्रमांकावर
5. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, तर राज्य सरकारकडून अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण समितीची स्थापना
6. एबीपी माझाचा लोगो वापरुन 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेबाबत खोटी पोस्ट व्हायरल, शरद पवारांच्या दबावामुळे मालिका बंद केल्याचा पोस्टमध्ये उल्लेख, खासदार अमोल कोल्हेंची कारवाईची मागणी
एबीपी माझा वेब टीम