LIVE | नवी दिल्ली : कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वर्ल्ड बँकेशी 15 अब्ज रुपयांचा करार

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या निषेधार्थ या बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यभरात बंदचे पडसाद पाहायला मिळत आहेत.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 24 Jan 2020 11:03 PM
भीमा कोरेगाव प्रकरण, एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार, केंद्रीय गृह खात्याने राज्य सरकारला दिली माहिती, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं
नवी दिल्ली : कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 15 अब्ज रुपयाांचा करार, महाराष्ट्रातील कृषी उद्योगासाठी सरकारचा वर्ल्ड बँकेशी करार
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नाहूर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प, धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प
महाराष्ट्र बंद 4 वाजता मागे घेणार, बंदला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार : प्रकाश आंबेडकर
औरंगाबाद (कृष्णा केंडे) : पैठण-औरंगाबाद रोडवर गेवराई येथे बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
अकोला (उमेश अलोणे) : महाराष्ट्र बंद दरम्यान दुकानं बंद करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्यात बाचाबाची झाली. अकोल्यातील स्टेशन चौकात ही घटना घडली.
हिंगोली (विकास दळवी) : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. हिंगोली शहरात काही तरुण कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन रस्त्यावर घोषणा दिल्या. या प्रकरणी सहा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भिवंडी (अनिल वर्मा) : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धामणकर नाका याठिकाणची दुकानं बंद केली. तसंच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत घोषणाबाजीही केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
इंदापूर (राहुल ढवळे) : इंदापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
नंदुरबार (भिकेश पाटील) : वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नंदुरबार जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर शहादा इथे कडकडीत बंद तर नंदुरबारमध्ये संमिश्र प्रतिसाद दिसत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
औरंगाबाद (कृष्णा केंडे) : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद पाहायला मिळत आहेत. औरंगाबादमध्ये या बंदला हिंसक वळण लागलं आहे. वाळूजला जाणाऱ्या औरंगाबाद सिटी बसवर पंचवटी हॉटेलजवळ दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत बसची काच फुटली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.

প্রেক্ষাপট

मुंबई : झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए, सीएएविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये 35 संघटना सहभागी होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला. तरी, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आजचा बंद पुकारण्यात आलाय. त्यामुळे आता या बंदला महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


पाहा व्हिडीओ : सीएएविरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद, प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद




वंचित बहुजन आघाडीकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये एकूण 35 संघटना सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे . तसेच जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याला विरोध करीत आंबेडकर यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका केली. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना, हा कायदा लागू करणारच, अशी भूमिका शहा मांडत आहेत, हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले आहेत.


पाहा व्हिडीओ : प्रकाश आंबेडकरांचं नाईट लाईफला समर्थन




दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत सर्व सामाजिक आर्थिक माहिती समोर येते मग एनपीआरची वेगळी गरज काय आहे? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला होता. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसी संघटना अनेक वर्षांपासून त्यांच्या जातीनिहाय गणनेची मागणी करत आहेत. त्यांची ती मागणी मान्य न करता, नॅशनल पॉप्युलेशन सेन्सस केली जात आहे. कोणतेही परिवर्तन टप्प्या टप्प्याने घडवायचे असते. मात्र मोदी सरकारने जीएसटी सारखे निर्णय एका झटक्यात केले. त्यामुळे ते अधिकारी, व्यापारी कोणालाच कळले नाही. नोटबंदी करून काळ्या पैशावर चालणारे अनेक व्यवसाय-रोजगार बंद झाले आहेत. त्याचे विपरीत परिणाम आर्थिक स्थितीवर झाले आहे.


पाहा व्हिडीओ : इंदूमिलमधील स्मारकाच्या उंचीसाठी निधी देण्यापेक्षा वाडिया रुग्णालयासाठी द्या : प्रकाश आंबेडकर




देशात आवश्यक खर्च करण्यासाठी किमान 14 लाख कोटी लागतात. सध्या सरकारकडे फक्त 11 लाख कोटी जमा झाले आहे. 1 फेब्रुवारी ला केंद्रीय अर्थसंकल्प येणार आहे. तोपर्यंत 3 लाख कोटींची ही तूट भरून निघेल असे वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशाला आर्थिक दिवाळखोरी कडे नेत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केला. देशात अशी परिस्थिती असताना विरोधक सरकारला हवं तसा तीव्र विरोध करत नाही. त्यामुळेच 24 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीने सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्या संघटनांसह बंद पुकारणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.


संबंधित बातम्या : 


24 जानेवारीला सीएएविरोधात राज्यव्यापी बंद, 35 संघटनांचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.