LIVE BLOG | आज दिवसभरात | 16 डिसेंबर 2019
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
প্রেক্ষাপট
राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. महाविकासआघाडी सरकारचं आजपासून पहिलं अधिवेशन, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप शिवसेनेची कोंडी करण्याच्या तयारीत
2. सत्तेसाठी शिवसेना किती लाचार होणार, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा सवाल, तर भाजपनेच सावरकरांच्या तत्वांशी द्रोह केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
3. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं आंदोलन, विद्यार्थ्यांच्या दगडफेकीत 5 पोलीस कर्मचारी जखमी, भाजप हिंसा करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
4. आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता, 31 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल जारी करण्यात येणार असल्याची माहिती
5. पीएमसी खातेधारकांच्या आक्रोशाची अखेर मातोश्रीकडून दखल, अधिवेशनानंतर मुख्यमंत्री खातेदारांना भेटणार, घोटाळ्याबाबत माहिती देण्याची अधिकाऱ्यांना सूचना
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -